फलटण चौफेर दि ३ १ सप्टेंबर रोजी गणपती आगमन सोहळा मिरवणुकीत सह्याद्री गणेश तरुण मंडळ, कर्तव्य ग्रुप गणेश तरुण मंडळ, अजिंक्य तारा गणेश मंडळ या मंडळाचे समोर वाजविण्यात आलेल्या डॉल्बी चालकावर ध्वनी प्रदूषण उल्लंघन प्रकरणी न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. व २ सप्टेंबर रोजी भुई गल्ली तरुण मंडळ ढोणे कॉलनी सातारा यांचे गणपती आगमन सोहळा मिरवणुक राजवाडा ते देवी चौक अशी सार्वजनिक रोडवर मिरवणुक घेवुन जात असताना भुई गल्ली तरुण मंडळ यांनी पाटील प्लस साऊंड सिस्टीमचा टेम्पो एम.एच.११ एफ-३१४७ वर लावुन सार्वजनिक रोडवर मोठमोठ्याने वाजवुन ध्वनी प्रदुषणाचे उल्लंघन केले असल्याने शाहुपुरी पोलीस ठाणे चे बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर साऊंड सिस्टीमचा ध्वनी मापक यंत्राद्वारे मोजनी करुन सदर साऊंड सिस्टीम मालकावर ध्वनी प्रदुषन अधिनियमनुसार कायदेशीर कार्यवाही करणेत आलेली आहे.या वाहन मालकाने वाहनाचे चेसी व बॉडीमध्ये बेकायदेशीर बदल केला असल्याने सदरचे वाहन पुढील कारवाई कामी मा.उप- प्रादेशीक परिवहन कार्यालय येथे जमा करणेत आलेले आहे.।