Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्रीक्षेत्र वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात देवाला सोन्याचा गाभारा अर्पण



फलटण चौफेर दि २५:श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर यांचेमार्फत समस्त भक्त भाविक, सालकरी, मानकरी, दागीनदार, ग्रामस्थ,विश्वस्त व सल्लागार- श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट यांच्या उपस्थितीत आज श्रावणी रविवारी विधिवत भैरवयाग यज्ञ, तसेच भक्तिमय वातावरणात श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर वीर येथे “श्रीनाथांना सोन्याचा संपूर्ण गाभारा, सुवर्ण चौकट, चांदीची प्रभावळ अर्पण करण्यात आला.”सकाळी ६ वाजता मंदिरात विधिवत भैरव याग यज्ञ, सकाळी ७ वाजता अभिषेक, सकाळी ११ वाजता  अपर्ण सोहळा व ११.३० पासून महाप्रसाद आयोजन करण्यात आल्याचे देवस्थान ट्रस्टचे चेअरमन श्री. संतोष धुमाळ यांनी सांगितले.मागील वर्षी देवाच्या संपूर्ण गाभाऱ्याचे सुवर्णमखरात रुपांतर करण्याचा ध्यास घेत गावातील प्रतिष्ठीत मंडळींच्या मार्गदर्शनाखाली देवस्थान ट्रस्टने सर्व भाविकांचे सहकार्य घेत देणगीच्या माध्यमातून देवाला सोने चांदी व देणगी देत सदर काम पूर्णत्वाला नेण्यास खूप सहकार्य केल्याचे देवस्थान ट्रस्टचे खजिनदार अमोल धुमाळ यांनी सांगितले.सदर कार्यासाठी मोलाचे सहकार्य व देणगीदार सर्व भाविक भक्त, देणगीदार, ग्रामस्थ  यांच्या उपस्थितीत सदर सोहळा व्हावा व आज हा सोहळा होत असल्याने सर्वांची इच्छा पूर्ण होत असून यापुढे अधिक काम करण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे व सदर कामी माजी विश्वस्त श्री दिलीप दादा धुमाळ व मित्रपरिवार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले असे सचिव अभिजित धुमाळ यांनी सांगितले.सदर कामाची व्याप्ती पाहता आजच देवाच्या पुढील कामासाठी तात्यासाहेब काळे अण्णासाहेब काळे, थेऊर यांनी ५ तोळे सोने अर्पण केले.आज रविवार भंडारा धारक प्रमोद गरुड, अरुण राजीवडे, जालीन्धर पवार, रुक्मिणी बनकर, संजय बधे, अविनाश बडदे व श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान वीर यांनी अन्नदान केले.  सदर कार्यात ट्रस्टचे विश्वस्त हनुमंत धुमाळ, संजय कापरे, नामदेव जाधव, राजेंद्र कुरपड दत्तात्रय समगिर, तसेच सल्लागार मंडळ, प्रतिष्ठित ग्रामस्थ, सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, ग्रामस्थ सर्व भाविक भक्त यांनी सर्व व्यवस्था पहिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.