Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सेंट्रींग कामाच्या साडेअकरा लाख रुपये किमतीच्या प्लेटा चोरणाऱ्या सराईतास पुसेगाव पोलिसांनी दोन तासात केले जेरबंद

 




फलटण चौफेर दि २५

 खातगुण ता. खटाव गावच्या हददीतील वेदावती हायस्कूल शाळेच्या जवळ  अमोल दिलीप जाधव यांचे नवीन घराचे बांधकाम चालू असले ठिकाणी यातील बांधकाम ठेकेदार हणमंत हैबती आसंगी रा. पुसेगाव ता. खटाव यांनी घराचे बांधकामाचे स्लॅबसाठी ९५ लोखंडी प्लेटा आणून बांधकाम साईटवर ठेवलेल्या होत्या. स्लॅबसाठी ठेवलेल्या सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या ९५ लोखंडी प्लेटा दिनांक २४  रोजी सायंकाळी ६.३० वा. ते दिनांक २५  रोजीचे सकाळी ०७.०० वाजणेचे दरम्यान रात्रीचे वेळी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेलेबाबतची तक्रार यातील फिर्यादी बांधकाम ठेकेदार हणमंत हैबती आसंगी रा. पुसेगाव ता. खटाव यांनी दिनांक २५ रोजी पुसेगाव पोलीस स्थानकात दिली होती त्यानुसार पोलीस पुसेगाव पोलिसांनी तपास घेऊन संशयित सराईत  सोमनाथ ऊर्फ बाल्या शरद लावंड वय ३२ वर्षे, रा. खातगुण ता. खटाव जि. सातारा याला अटक केली आहे याबाबत पुसेगाव पोलीस ठाण्यातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार,

सदर गुन्हयातील सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या ९५ लोखंडी प्लेटा चोरणारे आरोपींना निष्पन्न करुन त्यांना गुन्हयामध्ये अटक करुन गुन्हयातील चोरीस गेलेला माल जप्त करणे हे पुसेगाव पोलीसांचे समोर खूप मोठे आव्हान होते. सदर चोरीच्या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेत दोन दिवसांपुर्वीच पुसेगाव पोलीस ठाणेचा कार्यभार स्वीकारलेले  संदीप पोमण सहाय्यक पोलीस निरीक्षक पुसेगाव पोलीस स्टेशन यांनी पुसेगाव पोलीस स्टेशनचे त्यांचे सहकारी व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने अज्ञात आरोपीचा शोध घेणेकामी अथक परिश्रम करुन, सापळा रचून गुन्हा दाखल झाल्यापासून दोन तासांचे आत आरोपीचा व चोरीस गेलेल्या मालाचा तसेच गुन्हयात वापरलेल्या चारचाकी वाहनाचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणला. सदर गुन्हयामधील फिर्यादी यांच्या बांधकामासाठी ठेवलेल्या सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या लोखंडी प्लेटा चोरुन बोलेरो अॅक्स पिकअप गाडीतून नेऊन विक्री करण्याच्या तयारीत असणारा सराईत संशयित सोमनाथ ऊर्फ बाल्या शरद लावंड वय ३२ वर्षे, रा. खातगुण ता. खटाव जि. सातारा यास सापळा रचून मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्याचेकडून गुन्हयातील चोरीस गेलेल्या दीड लाख रुपये किमतीच्या लोखंडी प्लेटा व व चोरीचा माल विक्रीसाठी वापरलेली दहा लाख रुपये किमतीची पांढ-या रंगाची बोलेरो अॅक्स पिकअप गाडी नंबर एम.एच.०९ एफ. एल. ९७३६ असा एकूण साडे अकरा लाख रुपये किमतीचा संपूर्ण मुददेमाल ताब्यात घेऊन आरोपीस गुन्हयाचे कामी तात्काळ अटक करण्यात आली आहे. पुसेगाव पोलीसांच्या या धडाकेबाज कामगिरीबददल पुसेगाव पोलीस स्टेशनचा दोन दिवसापूर्वीच चार्ज घेणारे  संदीप पोमण सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे व त्यांचे सहका-यांचे जनतेतून कौतुक व अभिनंदन होत आहे.

 समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती सोनाली कदम उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक  संदीप पोमण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर भोसले, पोलीस हवालदार तात्या ढोले, दौलत कुदळे, योगेश बागल, पोलीस नाईक सुनिल अबदागिरे, अशोक सरक, तुषार बाबर, पोलीस कॉस्टेबल शंकर सुतार, ज्ञानेश्वर जाधव यांनी सदरची कारवाई केली आहे. कारवाई पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे  समीर शेख पोलीस अधीक्षक व श्रीमती सोनाली कदम उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव यांनी अभिनंदन केले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.