Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

निरा खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर सुरूच २४ तासांत चारही धरणात ६.८ टीएमसी पाण्याची आवक

 


फलटण चौफेर दि २६

निरा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर सुरूच असून आज सकाळी  ६ वाजेपर्यंत भाटघर, निरा देवघर वीर व गुंजवणी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस पुढीलप्रमाणे झालेला पाऊस पुढीलप्रमाणे

गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ६९ मि.मी. एकूण२४६२मि.मी. पाऊस झाला असून धरणात ९६.६९% पाणी साठा व २४४९ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे

     भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ८२ मि.मी. एकूण ११२९मि.मी. पाऊस झाला असून धरणात १००% पाणी साठा झाला आहे धरणातून २२ हजार ६३१ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे नीरा - देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १२९ मि.मी. एकूण २०८२ मि.मी. पाऊस झाला असून धरणात १०० % पाणी साठा झाला असून १२ हजार ६० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २३ मि.मी. एकूण ४३८ मि.मी. पाऊस झाला असून धरणात १०० % पाणी साठा झाला असून  वीर धरणाच्या सांडव्याद्वारे ७१ हजार ३४८९  क्यूसेक एवढा विसर्ग सुरू आहे चारही धरणात मागील २४ तासात ६.८ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.