फलटण चौफेर दि १ नीरा मोरगाव रस्त्यावर जगताप वस्ती येथे नीरा डाव्या कालव्याच्या पुलावर आयशर टेम्पो क्र. एम एच १२ एफ झेड ३३१९ व सायकल स्वाराच्या अपघातात पोकळे वस्ती येथील इजाज खुर्शीद सय्यद वय १६ रा. निरा (पोकळे वस्ती) या मुलाचा जागीच मृत्यू झाला
ट्रक आणि सायकलच्या झालेल्या धडकेनंतर ट्रकचालक पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना गुळूंचे नजीक त्याला ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले. अपघात इतका भीषण होता की ट्रकचे एक चाक या मुलाच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला संतप्त जमावाने हा ट्रक रस्त्यावरतीच पेटवून दिला. अधिक तपास करंजेपुल पोलीस करत आहेत अमरजित भागवत बोकारे रा लातूर याला पोलिसांनी अटक केली आहे