Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तालुकास्तरीय शालेय बुद्धीबळ स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगीरी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी ५ विद्यार्थ्यांची निवड

 



फलटण चौफेर दि १ फलटण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धा मंगळवार  दि. २७ व बुधवार २८ ऑगस्ट  रोजी सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल, फलटण ता. फलटण  येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटणच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले व जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली .या स्पर्धेमध्ये मुलांच्या १९ वर्षांखालील  गटामध्ये चि.  सिद्धांत साळूंखे याने प्रथम क्रमांक संपादन केला . १७ वर्षाखालील मुलांच्या गटात चि. साहिल सूळ याचा द्वितीय क्रमांक तर चि. मिथीलेश तांबे याचा तृतीय क्रमांक  संपादन केला .तर मुलींच्या  तालुका स्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत १४ वर्षाखालील  गटात कु. प्रज्ञा गांधी  द्वितीय क्रमांक  तर कु. मधुरा गुजर हिने  पाचवा क्रमांक  संपादन केला .

सर्व यशस्वी बुद्धिबळपटूंचे व त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक श्री संतोष तोडकर यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा विद्यमान विधान परिषद सदस्य आमदार मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती  चे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी तथा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन श्री शिवाजीराव घोरपडे, प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम, तपासणी अधिकारी श्री दिलीप राजगुडा , प्राचार्य श्री सुधीर अहिवळे, माध्यमिकचे उपप्राचार्य श्री नितीन जगताप, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री सोमनाथ माने , पर्यवेक्षिका सौ पूजा पाटील, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य, क्रीडा समितेचे सचिव श्री सचिन धुमाळ , बी. बी. खुरंगे ,अमोल सपाटे, अमोल नाळे, डी एन जाधव तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन  केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.