साखरवाडी पुढारी वृत्तसेवा गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे सध्या संपूर्ण राज्यभरात तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती आहे फलटण तालुक्यासह खंडाळा, माळशिरस तालुक्यामध्ये सुद्धा मागील एक महिन्यापासून नीरा उजवा कालव्याचे आवर्तन बंद झाल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई जाणवू लागली होती या अनुषंगाने फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना तालुक्यातील पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेत वीर धरणातून नीरा उजवा कालव्यामध्ये पाण्यासाठी आवर्तन सोडण्याची मागणी केली होती . सध्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची अंतिम धामधूम सुरू असताना व प्रशासन यामध्ये व्यस्त असताना जिल्हाधिकाऱ्यांनी या मागणीची उचित दखल घेत वरिष्ठ पातळीवर आदेश देऊन दि २ रोजी वीर धरणातून कालव्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरू करण्याबाबत आदेश दिले त्या अनुषंगाने नीरा उजवा कालव्यात ६५० क्युसेक क्षमतेने पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडले आहे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचत करून पाऊस पडेपर्यंत पाणी बचतीने वापरण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे
फलटण तालुक्यातील तब्बल ५५ गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना नीरा उजवा कालव्यावर अवलंबून आहेत सध्या फलटण मध्ये ती सून अधिक टॅंकरने नागरिकांना व जनावरांना पिण्याचा पाणीपुरवठा केला जात आहे त्यामुळे नीरा उजवा कालव्याचे पिण्याचे आवर्तन सुटल्याने नागरिकांना फार मोठा दिलासा मिळणार आहे
नीरा उजवा कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सुटले आहे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून पाणी काटकसरीने वापरावे सचिन ढोले उपविभागीय अधिकारी फलटण