Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

निरगुडी येथे जमिनीच्या वादातून एकाला दगडाने मारहाण

 


फलटण चौफेर दि १निरगुडी ता फलटण गावाच्या हद्दीत गट नंबर २४५ मधील ७ गुंठे जमीनीच्या वादातून संशयित जिजाबा बबन चव्हाण रा निरगुडी यांनी फिर्यादी अमोल मोहन सस्ते यांना हाताने लाथा बुक्क्याने व दगडाने मारहाण केल्याची घटना घडली आहे संशयितावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिथून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, निरगुडी गावातील गट नंबर २४५ मधील सात गुंठे जमिनीवरून फिर्यादी व संशयीत यांच्यामध्ये वाद असून हा वाद न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे फिर्यादी  दिनांक ३० मे रोजी सकाळी ९ वाजण्याचा सुमारास पाईपलाईन करण्याकरता शेतात गेले असता संशयिताने 'तू या जमिनीत यायचे नाही' असे म्हणून फिर्यादीला हाताने लाथा बुक्क्याने व दगडाने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार मोहन हंगे करीत आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.