फलटण चौफेर दि १३अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या चौधरवाडी ता फलटण येथील मुलांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शैक्षणिक व सामाजिक विचार मंच या संस्थेचे पंख मिळाले गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी या संस्थेने विशेष शिक्षकांची नेमणूक केली शिक्षणांबरोबरच खेळात सुद्धा मुलांनी आघाडीवर असावे म्हणून क्रांतीज्योती क्रीडा मंडळाची स्थापना करण्यात आली या मंडळाच्या वतीने मुलांना विविध राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठवले जाते नुकत्याच नाशिक येथे झालेल्या सहाव्या राष्ट्रीय फेडरेशन ऑफ इंडिया या स्पर्धांमध्ये क्रांतीज्योती क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी अनेक पारितोषिके जिंकली आहेत यामध्ये ओंकार मोहन कानडे याने ८०० मीटर धावणे मध्ये प्रथम क्रमांक मिळवला तर याच स्पर्धेत रोहन विनोद हिप्परकर याने द्वितीय क्रमांक मिळवला कोमल महेंद्र खिलारे या विद्यार्थिनीने चारशे मीटर धावणे प्रकारात प्रथम क्रमांक तर प्रतिज्ञा महेंद्र खिलारे हिने ही प्रथम क्रमांक पटकवला आहे चौदा वर्षे वयोगटातील कुणाल नंदकुमार बनसोडे याने प्रथम क्रमांक तर सोहम राजेंद्र हिप्परकर याने दुसरा क्रमांक मिळवला अमृता अंकुश डंबरे हिने दोनशे मिटर धावणे प्रकारात प्रथम क्रमांक तर १४ वर्षे वयोगटात धनश्री गजानन पवार हिने प्रथम क्रमाक व ईश्वरी मनोज भोसले दुसरा क्रमांक १७ वर्षे वयोगटात ऋषिराज दिलीप खराडे प्रथम तर प्रतीक्षा अनिल मदने प्रथम क्रमक मिळवला आहे १०० मिटर धावणे प्रकारात सत्यजित सागर मोरे याचा तृतीय क्रमांक मिळवला
पुढील आंतरराष्ट्रीय क्रिडा स्पर्धा ही नेपाळ या ठिकाणी होणार आहे.या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे खेळाडू सहभागी होतील.सर्व यशस्वी खेळाडू यांचे विचारमंच अध्यक्ष तुकाराम कोकाटे सदस्य व ग्रामस्थ यांनी विशेष अभिनंदन केले

