श्री. योगीराज गुणानाथ महाराज संजीवन समाधी मंदिर, श्री विठ्ठल प्रसादिक भजनी मंडळ व ग्रामस्थ पिंपळवाडी/ साखरवाडी.
आपण आपल्या दैनंदिन कामामध्ये व्यस्त असतो, उठल्यापासून प्रपंच, नोकरी, पैसा, मनोरंजन, मोह, या सर्व भौतिक विषयात रममान होतो. पण मनशांती मिळते, ती फक्त ईश्वर चिंतनातच, म्हणून वेगळ्या वातावरणात जाऊन, समूहामध्ये राहून, मनाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी, परमेश्वराची आराधना उपासना करण्यासाठी, व *माणसातील देव पण जाणून घेण्यासाठी, असते ती वारी.
टाळ, वीणा, मृदंग, हाती झेंडा, गळ्यात तुळशीच्या माळा, मुखात हरिनाम, या संतांच्या नामाचा जयघोष करीत, वारकरी दर मुक्काम दरकोस करत जातात.
वाटेवरच्या गावात त्यांच्या जल्लोषाची स्वागताची तयारी असते, मग या अध्यात्म मार्गावरून चालणाऱ्या दिंडीला आर्थिक आधाराची ही गरज असते, काही ठिकाणी गावकरी मनापासून वारकऱ्यांच्या जेवण खाण्याची सोय करतात, ही आर्थिक शक्ती येते माणसाच्या वृत्तीतून, यामुळे वारीला नसते कमतरता कशाची, परंतु वारीत लाखो भाविक स्वखुशीने स्व नियोजनाने सामील होतात,
गावो गावचे वारकरी आपापल्या गावातील दिंडीत सामील होतात, नेलेल्या वारकऱ्यांची जेवण, राहणे, याची व्यवस्था करण्यासाठी दिंडी चालक नियोजन करीत असतात, यामध्ये अहोरात्र ते झटत असतात
यामध्ये मुक्कामाच्या ठिकाणाचे वारी पूर्वी नियोजन केले जाते, ज्या ज्या ठिकाणी मुक्काम आहे, त्या ठिकाणावरील जागा मालकाची वारी पूर्वी गाठ घेऊन, रीतसर त्यांची परवानगी घेतली जाते, जागा मालक स्वखुशीने जागा देत असतात, व मदतही करत असतात, नियोजना संदर्भात नुसता फोन केला तरी ते वाट बघत असतात, चहा नाश्त्याची उत्तम व्यवस्था ही करतात. त्यांनाही वारकरी रूपात भगवंत सेवेचा आनंद घेता येतो.
मुक्कामाच्या ठिकाणी तंबू ठोकणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, आंघोळीच्या पाण्याची व्यवस्था करणे, तसेच वारकरी मुक्कामाच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना चहापाणी व लगेचच जेवणाची व्यवस्था करणे, यामध्ये भाजीपाला आणणे, निवडणे, इत्यादी कामासाठी दहा ते पंधरा स्त्री-पुरुष अहोरात्र झटत असतात, महिला पुरुषांसाठी वेगवेगळे तंबू उभारणे त्यांची व्यवस्था पाहणे, परत दुसऱ्या दिवशीच्या मुक्कामासाठी त्याच पद्धतीने व्यवस्था करावी लागते, त्यामध्ये मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी वाहन रात्री लवकर हलवावे लागते, नाहीतर वाहने अडकून पडतात व पुढील सर्व नियोजनाचा घोटाळा होतो.
दिंडीतील वारकरी पहाटे तीन वाजता उठून प्रातविधी उरकून गार पाण्याने अंघोळ करुन चालायला सुरुवात करतात. मग दुपारच्या जेवणासाठी दुसऱ्या मुक्कामाच्या ठिकाणी दिंडी चालकाची धावपळ सुरू होते, हे *नियोजन करणाऱ्यांना प्रत्यक्ष वारीत सामील होता आले नाही तरी, आलेल्या वारकऱ्यांची सेवा करण्यातच ते आनंद मानतात. अशाप्रमाणे हजारो स्त्री-पुरुष आपले श्रमदानातून भगवंताची सेवा करत असतात
या वारीने मनातील वासना, विकारांचा, निचरा तर होतोच, पण मनातला उत्साह ओसंडून वाहतो. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो, अध्यात्माचा मार्ग कळतो, यामध्ये एकत्रितपणे वावरत असल्यामुळे मिळणारा आनंद जणू पराकोटीचा असतो.
आयुष्याला अध्यात्माची बैठक हवी, त्याशिवाय जगण्याला अर्थ नाही.
वारीमध्ये नामस्मरण करत माऊली माऊलींचा जयजयकार करत वारकरी चालत असतात, तेव्हा तिथे कोणतेही भेद राहत नाहीत, सर्व धर्म समभाव, हीच संतांची शिकवण घेऊन वारकरी चालत राहतात. वारीमध्ये सामुदायिक उपासनेची वाढ होते ओढ लागते ते भगवान पांडुरंगाच्या दर्शनाची,
पंढरीचा वास
चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे
मनात ही आसुसलेले भक्ती असते विठोबाचे रूप पाहण्याची ओढ प्रत्येक वारकऱ्याच्या मनात एक कुतूहल बनून असते. फक्त त्याच्या भेटीसाठी हा मेळा हरिजागर करीत चालत राहतो, यामध्ये लहान, मोठे, वृद्ध, स्त्री, पुरुष, यांचा सहभाग असतो, सर्व जाती धर्मातील संतांच्या पालख्या व दिंड्या या सोहळ्यात सामील होतात, रिंगण सोहळा, हा वारीतील प्रमुख भाग असून तो विशेष आकर्षण ठरतो, मनातील भक्तीचे परिमळ घेऊन दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात.
अशा प्रकारची वारी मनातील पापी विचारांचा नाश होऊन, मनामध्ये सद्भावना, सदविवेक, जागृत होतो, चंद्रभागेमध्ये स्नान करून ,तन, मन, शुद्ध करून ऊन, वारा, पाऊस, चिखल, याची तमा न बाळगता ईश्वराच्या नामात तल्लीन होऊन जातात, आणि माऊली माऊली म्हणून संबोधतात. तेव्हा त्या शब्दांच्या माध्यमातून मिळणारा जो आनंद आहे, जी श्रीमंती आहे, ती इतर कोणत्याही परिमाणात मोजू शकत नाही, ही असते खरी वारीची शांती. त्यामुळे मन प्रसन्न होतं, मग नामदेवाच्या पायरीचे, शिखराचे, भगवान पांडुरंगाचे दर्शन घेतात, ही वारी मनाला एक चैतन्य देऊन जाते. आणि या वारीतील काही क्षण स्मरत राहतात, आणि मनाला आनंद देऊन जातात, त्यामुळे साहजिकच कुटुंबात आपण शांततेने समाधानाने वावरत असतो.
जीवनाला एक अध्यात्माची दिशा मिळते...... वारी हेच त्याचे एकमेव कारण
आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी
माऊलींचे प्रस्थान, दिनांक २९/६/२०२४ ते १७/७/२०२४
सहभागासाठी संपर्क
श्री. ह. भ. प. प्रकाश पवार महाराज पिंपळवाडी फो.नं. ९८६०५०४१६३
अनुभव वारीचा
श्री. रविंद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी. ता. फलटण. जि. सातारा. फोन. ९९७०७४९१७७
.jpg)