Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कराड शहरातील कुख्यात गुन्हेगारासह टोळीला मोक्का



फलटण चौफेर दि १२हजारमाची ता कराड येथील सोमा ऊर्फ सोमनाथ ऊर्फ आण्णा अधिकराव सुर्यवंशी (टोळी प्रमुख) व त्याचे दोन साथीदार रविराज ऊर्फ गुल्या शिवाजी पळसे व आर्यन चंद्रकांत सुर्यवंशी सर्व रा.हजारमाची ता. कराड जि.सातारा यांचेविरुध्द मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम १९९९) अन्वये दाखल गुन्हयांस  अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यस्था) महा, राज्य मुंबई यांची दि.११ रोजी परवानगी दिल्याने मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे.

 हजारमाची ता. कराड ग्रामपंचायत सदस्य व कराड शहर पोलीस ठाणे अभिलेखावरील गुन्हेगार सोमा ऊर्फ सोमनाथ ऊर्फ आण्णा अधिकराव सुर्यवंशी याचेविरुध्द यापुर्वी कराड शहर व पुणे येथे वैयक्तिक व टोळीने असे असे एकुण मिळुन १३ गुन्हे  दाखल आहेत. त्यामध्ये खुन, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, गदीं मारामारी, जुगार, अपहरण, सरकारी नोकरांवरील हल्ले व अवैध अग्निशस्त्र बाळगल्याबाबत गुन्हयांचा समावेश आहे.  यांचेविरुध्द  विशेष पोलीस महानिरीक्षक  कोल्हापुर यांचेकडे मोक्का अंतर्गत कलमवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता त्याला मंजुरी दिल्यानंतर सदर गुन्हयामध्ये मोक्का अंतर्गत कलमांचा समावेश करण्यात आला  अमोल ठाकुर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग यांनी गुन्हयाचा पुढील सखोल तपास करुन, आरोपींविरुध्द मा. न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्याची पूर्व परवानगी मिळण्याबाबत मा. अपर पोलीस महासंचालक साो (कायदा व सुव्यवस्था) महाराष्ट्र राज्य यांचेकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला दि.१० रोजी मंजुरी प्राप्त झाली असून, नमुद तिन्ही आरोपीविरुध्द आज रोजी मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

कराड शहर व परिसरातील आणखी काही कुख्यात गुन्हेगार पोलीस विभागाचे निशाण्यावर असुन, त्यांच्या हिंसक व गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असुन, कराड शहर व परिसरामध्ये आगामी काळात देखोल अशा प्रकारच्या कारवाया सुरु राहणार असल्याचा सुचक इशारा  समीर शेख मा. पोलीस अधीक्षक साो सातारा, श्रीमती आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक  सातारा,  अमोल ठाकूर, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिलेला आहे.समीर शेख, मा. पोलीस अधीक्षक साो सातारा, श्रीमती आंचल दलाल,अपर पोलीस अधीक्षक  सातारा यांनी सदर मोक्का कारवाई अनुषंगाने अमोल ठाकुर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड (तपासी अंमलदार), अरुण देवकर, पो.नि. स्थागुशा सातारा, कोंडीराम पाटील व.पो.नि.कराड शहर, प्रदिप सुर्यवंशी, तत्कालीन व.पो.नि. कराड शहर, संदिप शितोळे, सहा.पो.नि., अमित बाबर, सहा.पो.नि., अनिल पाटील पो.उ.नि., तसेच पोलीस अंमलदार, असिफ जमादार, अनिकेत पवार, संजय देवकुळे, संतोष सपाटे, महेश लावंड प्रशांत चव्हाण, प्रविण पवार, अमित सपकाळ, सागर बर्गे, दिपक कोळी, आनंदा जाधव, धीरज कोरडे, सोनाली पिसाळ यांचे अभिनंदन केले


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.