फलटण चौफेर दि १६ डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या महात्मा फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सासवड ता- फलटण येथे काल दि १५ रोजी नवीन शैक्षणिक वर्ष २०२४/२५ निमित्त विद्यालयात इयत्ता पाचवी ते बारावी नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प, पेन व सुलेखन वही व मोफत पाठ्यपुस्तके देऊन नवागतांचे स्वागत प्रशालेच्या प्राचार्या सौ. काकडे एस जी, सर्व शिक्षक- शिक्षिका, शिक्षिकेतर कर्मचारी यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले.
यावेळी शालेय पोषण आहारामध्ये सांबर भात आणि जिलेबी यांचे भोजन सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आले प्राचार्या सौ. काकडे एस जी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छांबरोबरच शालेय शिस्त, शालेय कामकाज याविषयी मार्गदर्शन करून विद्यालयात इयत्ता पाचवी ते बारावी ची प्रवेश प्रक्रिया*₹ सुरू असल्याचे सांगितले.
त्यानंतर विद्यालयात प्रा नितीन नाळे यांनी संस्थेची प्रतिज्ञा सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचेकडून म्हणून घेऊन येणाऱ्या शैक्षणिक वर्षात शैक्षणिक प्रगती करण्याचा निश्चय केला.याप्रसंगी प्रशालेच्या प्राचार्या, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.


