फलटण चौफेर दि १७फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण येथे कंपनीमध्ये काम करणाऱ्या व तसा अनुभव असणार्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा फाॅर वर्कींग प्रोफेशनलस कोर्स सुरू करण्यात आला असून त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ नरेंद्र नार्वे यांनी केले.
या कोर्स ला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी बारावी सायन्स फिजिक्स व गणित आवश्यक विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.कंपनीचे एक वर्षाचे अनुभव पत्र लागणार असुन त्यांना डिप्लोमा थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळणार आहे. त्या विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये काम करत अभियांत्रिकी चे शिक्षण घेता येणार आहे.
तसेच बारावी उत्तीर्ण (कोणत्याही शाखेतील ) विद्यार्थ्यांना बि.व्होक चे चार कोर्स साठी सुद्धा प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. डेटा सायन्स, इंटेरियर डिझाईनिंग, आटोमोबाईल सर्वीसींग, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्विसेस या कोर्स साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.कंपनीमध्ये काम करत असताना प्रमोशनसाठी बर्याचदा डिप्लोमाची आवश्यकता असते अशा लोकांसाठी हे कोर्सेस अत्यंत उपयोगी ठरणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी संपर्क साधुन प्रवेश घ्यावा असे आवाहन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
.jpg)
