साखरवाडी पुढारी वृत्तसेवा साखरवाडी ता फलटण गावातील अल्पवयीन मुलीचा लज्जास्पद बोलून पाठलाग केल्याप्रकरणी संशयित मनोज महादेव शिंगाडे वय ४७ राहणार साखरवाडी याच्यावर फलटण ग्रामीण पोलीस स्थानकात पोक्सो व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार ,दि १५ रोजी सकाळी ११ वाजण्याचा सुमारास अल्पवयीन पीडिता संशयताच्या घरामागून जात असताना संशयिताने लज्जास्पद बोलून पाठलाग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे गुन्ह्याच्या पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस करीत आहेत
.jpeg)
