फलटण चौफेर दि ३
ड्रोन ने निरीक्षण करून त्या भागात चोऱ्या केल्या जात असल्याची अफवा संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये पसरली आहे मात्र नागरिकांनी घाबरून न जाता याबाबत काही शंका असल्यास ११२ ला फोन करून किंवा त्या गावातील संबंधित पोलीस पाटलांना संपर्क करून माहिती देण्याचे आवाहन फलटण ग्रामीण पोलीस ठाणकाचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे त्यानुसार काल रात्रीपासून साखरवाडी भागामध्ये ड्रोन ने निरीक्षण करून चोऱ्या केल्या जात आहेत अशी अफवा आहे काही ठिकाणी साखरवाडी, जिंती,होळ परिसरात ड्रोन दिसून आले आहेत हेही खरे आहे अश्या प्रकारे कोणतीही चोरी फलटण ग्रामीण ला दाखल नाही अनेक फोटोग्राफर लोकांकडे किंवा हौशी लोकांकडे ड्रोन आहेत त्यातील काही लोक खोडसाळ पणाने ड्रोन रात्री रिमोट साह्याने आकाशात सोडत आहे
असे लोकांची गोपनीय माहिती असेल तर फलटण ग्रामीण पोलीसांना द्यावी
अफवेमुळे उगाच एखादे वाहन रात्री अपरात्री अडवून मारहाण करू नये चौकशी करा शंका आली तर पोलिसांना कळवा किंवा ११२ला फोन करा
शेजारी बारामती, दौंड परिसरात पण या प्रकारे ड्रोन दिसूनआले आहेत व अफवा पण आहेत याचा छडा लवकर लागेल पण कोणीही घाबरून जाऊ नये
बारामती विमानतळावरून काही शिकवू चार्टर प्लेन पण रात्री फिरतात त्याबाबत पण माहिती घेत आहोत
आपले भागात ज्या लोकांकडे ड्रोन आहेत त्याबाबत गोपनीय माहिती द्यावी
पोलीस महसूल परवानगी शिवाय ड्रोन उडवता येत नाही परंतु लग्न स्मारंभात याची मागणी असले मुले अनेक लोकांकडे ड्रोन आहेत अफवा न पसरवता नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे