सुरवडी ता.फलटण जि. सातारा येथील अमोल भोसले यांचे घरात अज्ञात चोरटयांनी गेटचे कुलुप व घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडुन आत प्रवेश करुन ४ लाख १० हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी केले होते.सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी गुन्हा तपासकामी स्थानिक गुन्हे शाखा सातारा येथे वर्ग केला, व पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना गुन्हयातील अज्ञात आरोपींबाबत माहिती प्राप्त करुन गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या अधिपत्याखाली तपास पथके तयार करुन त्यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या
त्यानुसार तपास पथकांनी गुन्हयाच्या घटनास्थळी वेळोवेळी भेटी देवून फिर्यादी, साक्षीदार व आजुबाजूच्या लोकांच्याकडे कौशल्याने तपास केला, घटनास्थळ परिसरात तांत्रिक तपास करुन गोपनिय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा सोन्या उर्फ सोमा उर्फ लाल्या ईश्वर भोसले वय ३५ वर्षे रा. बेलगांव, ता कर्जत जि. अहमदनगर, सतिष भीमराव पवार वय. ४९ वर्षे. रा. दैठणा ता. आष्ठी जि. बीड ( रिसिव्हर) यामधील सोन्या भोसले हा आरोपी हा शरीराविरुध्द व मालमत्तेच्या गुन्हयातील कुख्यात गुन्हेगार ईश्वर उर्फ ईश्वऱ्या भोसले याच्या २७ मुलांपैकी सर्वांत मोठा मुलगा असून त्याचेवर अहमदनगर, बीड, नाशिक, उस्मानाबाद, सातारा, सोलापूर या जिल्हयामध्ये व कर्नाटक राज्यामध्ये शरीराविरुध्द व मालमत्तेच्या एकूण ४१ गुन्हयात पाहिजे असलेला आरोपी आहे. याकरीता नमुद सर्व जिल्हयातील पोलीस दल या कुख्यात आरोपी सोमा उर्फ लाल्या ईश्वर भोसले मागावर होते, परंतू सदरचा आरोपी मिळून येत नव्हता. नमुद आरोपीचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर तपास पथक १ महिन्यापासून त्याच्या पाळतीवर राहून त्याच्या ठावठिकाण्याची माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत होते. तपास पथकास सदरचा आरोपी हा फलटण परिसरात वावरत असल्याची खात्रीशीर बातमी प्राप्त झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथक फलटण परिसरात वेषांतर करुन सलग ४ दिवस आरोपीच्या हलचालीवर लक्ष ठेवून होते.दिनांक १५ मे रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना सदर आरोपी सोन्या उर्फ सोमा उर्फ लाल्या ईश्वर भोसले रा. बेलगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर हा फलटण परिसरात सांगवी गावाच्या शिवारात दाट झाडीमध्ये लपुन बसला असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी तपास पथकास सदर आरोपी यास ताब्यात घेवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उप-निरीक्षक, विश्वास शिंगाडे, पोलीस अंमलदार अमोल माने, शिवाजी भिसे, केतन शिंदे, दलजित जगदाळे यांनी सदर ठिकाणी
जावुन आरोपी ज्या ठिकाणी लपुन बसलेला होता, त्याठिकाणी अचानक छापा टाकला असता सदर आरोपीने पोलीसांची चाहुल लागताच त्याच्याकडील गाडीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला पथकाने अतिशय शिताफीने त्याचा पाठलाग करून त्याचेवर झडप घालुन त्यास व त्याच्याकडील दुचाकी वाहन ताच्यात घेतले. त्यानंतर पथकाने त्यांच्याकडे कसोशिने व कौशल्याने तपास करुन त्याचेकडुन घरफोडीचोरीचे ०७, चोरीचे ०२ असे एकुण०९ गुन्हे उघड करुन चालु बाजार भावाप्रमाणे १९,४४,०००/- रुपये किंमतीचे २७ तोळे सोन्याचे दागिने, ५,४१,८००/- रूपये
किंमतीची ६ किलो चांदीचे दागिने, ५०,०००/-रूपये रोख रक्कम, १,००,०००/- रूपये किं. चे. दुचाकी वाहन, गुन्हयात वापरलेली कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, हातोडा असा एकूण २६,३५,८००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.