फलटण चौफेर दि ३ माढा लोकसभा निवडणुकीचा उद्या निकाल जाहीर होणार आहे कट्टर कार्यकर्त्यांचा उत्साह आता शिगेला पोहचला आहे एक्झिट पोलमध्ये जाहीर झालेल्या मतदानाच्या टक्केवारी वरून कार्यकर्ते विश्लेषक बनून आकडेवारी आमच्याच बाजूने कशी आहे हे सांगत आहे यामध्ये विविध पक्षातील गाव गावचे कार्यकर्ते आहेत अगदीच नवख्या असणाऱ्या पक्षाचे कार्यकर्ते देखील मोठ्या विश्वासाने भावा आमचीच हवा म्हणत आकडेवारीचा काथ्याकूट करीत आहेत
आकडेवारी मांडताना ती आपल्याच उमेदवाराला कशी फायद्याची आहे कुठून किती टक्के मतदान झाले इथं पासून कोणत्या बुथवर किती मतदान झाले त्या झालेल्या मतदानातून आमच्या उमेदवाराला किती मते विरोधी उमदेवराला किती मते कुठून कितीच लीड आणि कुठून कितीच लीड हे आकडेवारी वरून ठरवत आहेत
मतदानात वाढलेला टक्का आमचाच आहे म्हणत विरोधकांना गुंडाळून ठेवत आम्हीच कसे जिंकणार हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला जातो या पुढे जाऊन कार्यकर्ते विधानसभा मतदार संघाप्रमाणे आकडेवारी मांडतात कुणी बाजूनी आणि कुणी विरोधात केलं मतदान याचे आडाखे ही बांधत आहेत परंतू सगळ्या फॉर्म्युल्यांचा अभ्यास करून शेवटी विजय आमचाच होणार या उत्तरावर दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते येत आहेत जातीच्या समिकरणांची गणिते तर सांख्यकी विशेषकांना सुद्धा अचंबित करणारी आहेत कोण किती मते खाणार आणि कोणाला त्याचा फटका बसणार याचेही विश्लेषण गावगाड्याचे कारभारी आपल्या कार्यकर्त्यांना सांगतात एकूणच जो तो म्हणतोय भावा आमचीच हवा उद्याला गुलाल आमचाच आता यातले कुणाचे फॉर्म्युले किती बरोबर किती चूक हे उद्या दुपारीच कळेल तो पर्यंत असे कार्यकर्ते थकणार नाहीत आणि आकडेवारीचा काथ्याकूट सुरूच राहील