फलटण चौफेर दि १३ ८ जुलै रोजी सातारा जिल्ह्यात दाखल होणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांनी आज फलटण तालुक्यातील मुक्काम होणाऱ्या पालखी तळांना व विसावा ठिकाणांना भेट दिली व प्रशासनाकडून सुरू असलेल्या तयारी बाबतचा आढावा घेतला यावेळी फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉक्टर अभिजीत जाधव, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ, भावार्थ देखणे, बाळासाहेब आरफळकर यांची उपस्थिती होती तरडगाव ,सुरवडी ,निंभोरे ,वडजल, फलटण, विडणी बरड येथील पालखी तळांची पाहणी केली
यावेळी पालखी तळ व पालखी विसावा तळ या ठिकाणी संपूर्ण स्वच्छता करण्यात यावी तसेच पिण्याचे व वापराचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करावे पालखी सोहळ्याची आगमनावेळी वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी व पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्थेत आवश्यक ते बदल करावेत तसेच दिंड्यांची राहण्याची व्यवस्था उत्तम असावी त्या ठिकाणी वीज ,पाणी व इतर गोष्टी च्या सुविधा पुरवल्या जाव्यात याची काळजी घेण्यात यावी अशी मागणी विश्वस्त यांनी केली
सातारा जिल्ह्यातील व पालखी मार्गातील पहिले रिंगण तरडगाव येथे होते ते व्यवस्थित पार पडण्याच्या दृष्टीने प्रशाशन सज्ज आहे या ठिकाणी बांधण्यात आलेले नूतन चांदोबाचे लिंब मंदिर भाविकांसाठी आकर्षण असणार आहे या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले तसेच वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी प्रशाशन घेत आहे त्या साठी सर्व विभाग सज्ज असल्याचे ढोले यांनी सांगितले

