फलटण चौफेर दि १४ सध्याच्या दगदग व धावपळीच्या युगात अगदी २० ते २५ व्या वर्षीच मधुमेह, उच्च रक्तदाब,थायरॉईड, लठ्ठपणा अशा व्याधींना अनेकांना सामोरे जावे लागत तसेच वयाची पन्नाशी पार केलेल्या नागरिकांना सांधेदुखी, अपचन, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता अशा व्याधींना सामोरे जावे लागत असून वर्षानुवर्षे यावर उपचार घेऊन सुद्धा व्याधी जशाच्या तशा असल्याच्या अनेकांच्या तक्रारी असतात मात्र नियमित व्यायाम व शरीराला वयामानानुसार आवश्यक असणारा उचित सकस आहार घेतल्यास यावर आपण मात करू शकत असल्याचे प्रतिपादन जागतिक वरिष्ठ आरोग्य सल्लागार भानुदास भालेराव यांनी सुरवडी ता फलटण येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या प्रारंगणात देवा हेल्थकेअर व वेलनेस फॅमिली आयोजित मोफत आरोग्य मार्गदर्शन शिबिरात केले
यावेळी सुरवडीचे माजी उपसरपंच दिपक साळुंखे पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप सगरे, सुरेश पालखे,संभाजीराजे पवार,सुभाष साबळे,महादेव नलवडे,पंडीत कुंभार,उत्तम साळुंखे,मोहन जाधव, हेमंत वाघ,अनिल भोसले,दीपक माने ज्येष्ठ नागरिक महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते
मूळचे वालचंदनगरचे दांपत्य सागर व राणी बाबर यांनी सुरवडी येथे मागील महिन्यापासून सुरू केलेल्या मोफत व्यायाम वर्गांना सुरवडीसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला व तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला आहे सुरवडी येथील रेल्वे स्थानककाच्या परिसरात पहाटे ५ ते ६, ६ ते ७ व सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळात बाबरदाम्पत्य नोकरी सांभाळून मोफत व्यायामाचे वर्ग घेत असून यामुळे सुरवडीतील अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या वर्षानुवर्ष सुरू असलेल्या रक्तदाब मधुमेह व सांधेदुखीच्या त्रासांमध्ये मोठा दिलासा मिळाला असल्याचे यावेळी उपस्थित जेष्ठ नागरिकांनी सांगितले

