फलटण चौफेर दि १२फलटण तालुक्यातील खामगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच गणपत बोडरे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदासाठी झालेल्या निवडणूकीत खामगाव ग्रामपंचायतचे सदस्य कृष्णात दादासो झेंडे यांचा एकच अर्ज आला होता त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी कुंभार यांनी,कृष्णात दादासो झेंडे यांच्या नावाची उपसरपंच पदासाठी घोषणा केली
यावेळी होळ गावचे ग्रामविकास अधिकारी अतुल जाधव व खामगावच्या सरपंच ताराबाई तानाजी ढगारे ग्रामपंचायत सर्व सदस्य व तसेच ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रकाश पवार माजी सरपंच माधुरी प्रदीप जाडकर , हिरामण चाबूकस्वार, शकुंतला वैद्य, नितीन जगताप,तानाजी ढगारे, संजय कुचेकर सर्व सदस्य,ग्रामस्थ इत्यादी मान्यवर उपस्थित होते
या निवडीबद्दल राजे गटाचे प्रमुख नेते विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आमदार दीपकराव चव्हाण यांच्यासह साखरवाडी, खामगाव, होळ परिसरातून उपसरपंच कृष्णात झेंडे आप्पा यांचे अभिनंदन केले आहे.