फलटण चौफेर दि १२: फलटण शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकालगत असलेल्या दुकानासमोर दुचाकीला लटकविलेल्या बॅगमधील ३९ हजार रुपये लंपास केल्याप्रकारणी फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दि.१ जून रोजी सकाळी ११.३० ते१२.४५ वाजण्याच्या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात शिवाजी दत्तू नाळे, वय ७५, रा. वनदेवशेरी, कोळकी, ता. फलटण यांनी त्यांची दुचाकी (क्र. एम एच ११ क्यू ६८५०) लॉक करून ठेवली होती. सदर दुचाकीला अडकविलेल्या निळ्या रंगाच्या पिशवीतून अज्ञात चोरट्याने ३९ हजार रुपयाची रोकड व बँकेचे पासबुक चोरून नेले आहे. या बाबतची फिर्याद शिवाजी नाळे यांनी आज, दि. ११ जून रोजी दिली असून पुढील तपास पोलीस नाईक पूनम बोबडे करीत आहेत.