Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ड्रोनच्या वापराने चोरी ही अफवा नागरिकांनी घाबरून जाऊ नये- उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस

 


फलटण चौफेर दि ८

मागील आठ दिवसापासून फलटण तालुक्यातील साखरवाडी,सुरवडी, खामगाव, मुरूम, जिंती, खुंटे यासह इतर गावांमध्ये रात्रीच्या वेळी आकाशामध्ये उडणारे ड्रोन दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे अनेक गावांमध्ये नागरिक रात्रगस्त घालून रात्र जागून काढत आहेत ड्रोन चा वापर करून  चोरटे हेरगिरी करून निर्मनुष्य असणाऱ्या घरांची टेहळणी करून चोऱ्या करत असल्याबाबत नागरिकांमध्ये चर्चा आहेत मात्र फलटणचे पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस यांनी अशा प्रकारे ड्रोनच्या वापराने चोऱ्या होत असल्याची कोणतीही घटना फलटण तालुक्यामध्ये घडली नसल्याने नागरिकांनी या अफवांवर  विश्वास ठेवू नये तसेच  काही संशयास्पद आढळल्यास ११२ या नंबर वरती संपर्क साधण्याचे किंवा  स्थानिक पोलीस पाटलांना याबाबत कल्पना देण्याचे आवाहन फलटण तालुक्यातील नागरिकांना केले आहेत 

मागील दहा ते बारा दिवसापासून पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर, वडगाव, कोऱ्हाळे, मुंढाळे,  मुरूमसह परिसरातील भागांमध्ये नागरिकांना अशा प्रकारचे ड्रोन दिसले होते व हे ड्रोन उडवणारे संशयित चोरटे निर्मनुष्य घरांची टेहाळणी करून घरे फोडत असल्याबाबत नागरिकांमध्ये चर्चा असून अनेक ठिकाणी संपूर्ण रात्रभर नागरिक रात्रगस्त घालत आहेत  पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी अशा घटनांबाबत आपण बारामती पोलिसांच्या संपर्कात असून यासंदर्भात दौंड , बारामती पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेऊन लवकरच या प्रकरणाचा छडा लावण्यात येणार असल्याचे सांगितले

रात्रीच्यासुमारास  ड्रोन उडत असल्याबाबत आम्ही बारामती पोलिसांच्या संपर्कात असून यासंदर्भात दौंड , बारामती पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेऊन लवकरच या प्रकरणाचा छडा लावणार आहे राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.