Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विडणीतील मतदारांचा माढा लोकसभेच्या निवडणूकीत प्रचंड प्रतिसाद ७३.८८ टक्के मतदान



 विडणी - (योगेश निकाळजे) -  माढा लोकसभा मतदारसंघामधील विडणी या गावात एकूण ७३.८८% मतदान झाले असून विडणीतील कर्तव्यदक्ष नागरिकांनी आपले मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे.

     फलटण तालुक्यात सर्वात विकसनशील म्हणून विडणीची ओळख आहे याच विडणीत आज पार पडलेल्या माढा लोकसभेच्या मतदानामध्ये गावातील सूज्ञ व कर्तव्यदक्ष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळ पासूनच मतदान केंद्रावर गर्दी केली होती आज दिवसभर ऐन उन्हाच्या तडक्यातही लोक आपला मतदानाचा हक्क बजावत होते सायंकाळी ४ नंतर तर सर्व बुथवर मतदानासाठी मतदारांच्या मोठ्याच्या मोठ्या रांगा बघायला मिळाल्या यामध्ये पुरुषांसह महिला व युवावर्गानेही मोठया संख्येने मतदानाचा आपला हक्क बजावला.

     विडणीमध्ये एकूण ८ बुथ आहेत या सर्व बुथमध्ये पुढीलप्रमाणे मतदान झाले आहे बुथ क्रमांक -२३५ - १२२९ पैकी ९०९ बुथ क्रमांक २३६ -१२९५ पैकी ९०९ बुथ क्रमांक - २३७ मध्ये ८५३ पैकी ५९१ बुथ क्रमांक -२३८ मध्ये ६५० पैकी ५१३ बुथ क्रमांक २३९ मध्ये -१०२५ पैकी ८४५ बुथ क्रमांक २४० मध्ये १३०३ पैकी ९८१ बुथ क्रमांक २४१ मध्ये १३३६ पैकी ९९३ तर बूथ क्रमांक २४२ मध्ये १३३२ पैकी ९१५ जणांनी मतदान केले असून एकूण ८ बूथमधील ८९९७ मतदानापैकी ६६४७ इतके मतदान झाले असून एकूण ७३.८८ टक्के शेकडा मतदान झाले आहे.

    दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह देशाचेही लक्ष लागून असलेल्या माढा मतदार संघामध्ये एकूण ६० टक्के मतदान झाले आहे, एकंदरीत सर्वत्र ही निवडणूक शांततेत पार पडली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.