विडणी(योगेश निकाळजे) -विद्यार्थ्यांनी उज्वल भविष्यासाठी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यामध्ये टॉपलाच गेल पाहिजे व आपल्या नावासह गावाचाही नावलौकिक वाढवला पाहिजे असे मत श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे यांनी व्यक्त केले.
विडणी ता.फलटण येथील लक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्यावतीने इयत्ता दहावीमध्ये यश संपादन केलेल्या यशस्वी विद्यार्थांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी डॉ.बाळासाहेब शेंडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी पतसंस्थेच्या चेअरमन डॉ.सौ.सुचिता शेंडे,उत्तरेश्वर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.शुभांगी शिर्के,पतसंस्थेच्या संचालिका सौ.लता ननावरे , उपसरपंच सुनिल अब्दागिरे , हणमंतराव अभंग, लक्ष्मण भुजबळ,विडणी सोसायटीचे चेअरमन मारुतीराव नाळे, सर्जेराव कोकरे,राजीव पवार,मुरलीधर जगताप,वैभव पवार तसेच विडणी ग्रामपंचायत व सोसायटीचे सदस्यही उपस्थित होते.
यावेळी उत्तरेश्वर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.शुभांगी शिर्के ,उपसरपंच सुनिल अब्दागिरे ,डॉ.सुचिता शेंडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांनींचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी उत्तरेश्वर हायस्कूलमधील इयत्ता दहावीच्या परिक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेली कु.श्रेया राजेंद्र शेंडे ( 94 %) द्वितीय क्रमांक मिळवलेली कु.वैभवी राजेंद्र ननावरे ( 93.60% ) व तृतीय क्रमांक मिळवलेली कु.अस्मिता अमोल पवार (86.40%) या तिघींचाही प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व ट्रॉफी देऊन यथोचित सत्कार करण्यात आला,यावेळी उपस्थितांचे आभार पतसंस्थेचे मॅनेजर किशोर ननावरे यांनी मानले.
दरम्यान महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीच्या उत्तरेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा यावर्षी दहावीचा निकाल 94.59 % लागला असून श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे संस्थेचे अध्यक्ष हणमंतराव अभंग, उपाध्यक्षा सौ.डॉ.सुचिता शेंडे सचिव राजीव पवार तसेच संस्थेचे सर्व संचालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.