फलटण चौफेर दि ३०
फलटण लोणंद पालखी महामार्गावर खराडेवाडी गावाच्या हद्दीमध्ये नायरा पेट्रोल पंपाशेजारी चार चाकी गाडीने दुभाजकावरून विरुद्ध दिशेने जाऊन दोन दुचाकींना जोराची धडक देऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, अल्टो कार क्र एम एच १४ डीएक्स ०४६७ ही फलटणहून लोणंदच्या दिशेने चालली होती खराडेवाडी गावाच्या हद्दीत असणाऱ्या नायरा पेट्रोल पंपाशेजारी या गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकावरून विरुद्ध दिशेने जाऊन या गाडीने लोणंदहुन फलटणच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच ११ बीटी ९४८६ व एम एच ११ बी एस ८४८६ या दुचाकींना जोराची धडक दिली यामध्ये दोघेजण किरकोळ जखमी झाले असून एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला फलटण येथे खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे तसेच घटनास्थळी लोणंद पोलीस स्थानकाचे कर्मचारी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे