Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वीर धरणातून नीरा उजवा कालव्यात पिण्यासाठी पाणी सोडण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी- प्रांताधिकारी सचिन ढोले ५५ गावांच्या नळ पुरवठा योजना कालव्यावर अवलंबून



फलटण चौफेर दि २९ गतवर्षी  तालुक्यामध्ये झालेल्या अत्यल्प पावसामुळे सद्यस्थितीत फलटण तालुक्यातील  ८८ गावे प्रशासनाकडून टंचाईग्रस्त म्हणून घोषीत करण्यात आलेली आहेत. त्यापैकी ४१ गावे व१०६ वाडया/वस्त्यासाठी ३१ टँकरमधून पाणी पुरवठा सुरु आहे. नीरा उजवा कालव्यावरील पाण्यावर फलटण तालुक्यातील ५५ गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत त्यामुळे फलटण तालुक्यासाठी  वीर धरणामधून नीरा उजवा कालव्यातून पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी अधिकारी सचिन ढोले यांनी सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे केली  नीरा कालव्यावर अवलंबून असलेल्या फलटण नगरपरिषदेच्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरवरुन व मौजे. सुरवडी, ता. फलटण येथील महाराष्ट्र औदयोगीक विकास महामंडळाच्या मालकीच्या असलेल्या फिडींग पाँईटवरुन टँकर भरणे सुरु आहे. 

फलटण तालुक्याची एकूण लोकसंख्या ३ लाख ६७हजार ७५९ इतकी असून लहान मोठ्या जनावरांची एकूण संख्या १लाख ३८ हजार ९१४ इतकी आहे. सध्या टंचाई परिस्थिती असलेने फलटण तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची मागणी विचार करता, फलटण नगरपरिषदेच्या टँकरमध्ये दि.१० जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे त्यामुळे एकंदरीतच फलटण तालुक्याला पिण्यासाठी पाणी पुरवठा करणेकामी नीरा उजवा कालव्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे वीर धरणामधून निरा उजवा कालव्यामधून पिण्यासाठी पाणी सोडण्याची विनंती उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी केली आहे


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.