फलटण चौफेर दि १३ महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण भारत देशाचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती परंपरे प्रमाणे फलटण शहराबरोबर संपूर्ण तालुक्यात मोठया उत्साहात साजरी केली जाते त्यानुसार दि १० रोजी सुरवडी ता फलटण येथे अतिशय भव्य, दिव्य मिरवणुकीने शिवजयंती साजरी करण्यात आली ढोल ताशे, हलगी व डीजे च्या तालात फटाक्यांच्या आतीषबाजीत 'जय भवानी जय शिवाजी' च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता
दि ९ रोजी अजिंक्यतारा किल्ल्यावरून आणलेल्या शिव ज्योतीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज,धर्मवीर संभाजी महाराज,आदिशक्ती तुळजा भवानी मातेच्या आकर्षक चित्ररथांची मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत गावातील बाल चमुनीं ऐतिहासिक वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला होता.यावेळी सर्व कार्यक्रमांना गावातील महिलाचीं बहुसंख्येने उपस्थिती होती मिरवणुकीत शिवजयंती उत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते व सुरवडीसह पंचक्रोशीतील शिवप्रेमी उपस्थित होते.