Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नीरेचे पाणी पेटले ,आवर्तन पूर्ण करावे शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा : दि १९ पर्यंतची मुदत

 



फलटण चौफेर दि १४

         नीरा उजवा कालव्यातील पाण्यावरून माळशिरस, सांगोला आणि फलटण येथील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले सुरू असलेले आवर्तन अचानक बंद झाल्याने शेतकऱ्याचा संताप वाढलेला होता बंद झालेले पाणी हे ढिसाळ नियोजन व राजकीय हस्तक्षेपामुळे बंद करण्यात आले आहे असा गंभीर आरोप उपस्थित शेतकऱ्यांनी केला पाणी सुरू केल्या शिवाय मागे हटणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी बोलून दाखवला

            उत्तमराव जानकर यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत प्रश्नांचा भडिमार केला त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देता येत नसल्याने अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली यावेळी नीरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी शेतकऱ्यांसमोर यावे आणि उत्तरे द्यावीत अशी अपेक्षा जानकर यांनी व्यक्त केली परंतू ते आले नाहीत 

           या वेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, आ दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे ना निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटील, उत्तमराव जानकर यांच्या उपस्थितीत फलटण येथील उपविभागीय अभियंता  कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी आमदार दीपक चव्हाण यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना इशारा देत २४ तासात दुरुस्तीचे काम करून पाणी सोडण्यात यावे असे सांगितले 

             रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिनांक १९ पर्यंत अभियंत्यांना मुदत देत कालव्याचे काम करून घ्यावे सुरू असणारे आवर्तन पूर्ण करून मग उर्वरित कामे करावीत असे सांगितले कालवा सुरू करताना कालवा सल्लागार समितीतील सदस्यांना सांगता मग बंद करतांना कोणाला विचारून बंद केला असा सवालही मोहिते पाटील यांनी विचारला मुदतीत काम पूर्ण करा  अन्यथा या पेक्षा मोठा मोर्चा घेऊन आम्ही येऊ त्यावेळी पाणी घेऊनच परत जाऊ 


दुरुस्ती साठी कालवा बंद ...

नीरा उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू असताना कालव्याला मोठे भगदाड पडल्याने कालवा बंद करून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे नीरा उजवा कालव्याचा विसर्ग पूर्ववत केल्यास गळती वाढण्याची शक्यता आहे त्या खाली असलेली लोकवस्तीत पाणी शिरून वित्त व जिवीत हानी होऊ शकते असे प्रसिध्दीपत्रक नीरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी दिले आहे 


हक्कभंग आणू 

यावेळी हजारो शेतकऱ्यांच्या समोरच गळती झालेल्या ठिकाणी किती मशिन्स सुरू आहेत असे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विचारले असता दोन पोकलंड व दोन जेसीबी मशिन्स सुरू आहेत असे अधिकारी यांनी सांगितले परंतू मोर्चेकरी शेतकरी प्रत्यक्ष घटनास्थळी गेले असता या ठिकाणी फक्त दोन ट्रॅक्टर व एक जेसीबी मशीन सुरू असल्याचे दिसले यावरून रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अधिकारी एवढ्या जनते समोर खोटी माहिती देत असल्याने त्यांच्यावर हक्कभंग आणू असे सांगितले 

छावणीचे स्वरूप

         माळशिरस सांगोला पंढरपूर तालुक्यातील शेतकरी सकाळ पासूनच फलटण मध्ये येत होते तेवढ्याच मोठ्या प्रमाणात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता प्रांत कार्यालय व तहसिल कार्यालय कडेकोट बंदोबस्तात होते जिकडे तिकडे पोलिसांनी बंदोबस्त ठेवल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले होते यामुळे रोजच्या कामासाठी आलेल्या नागरिकांचा खोळंबा झाला होता



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.