फलटण चौफेर दि २७
साखरवाडी, ता फलटण येथील साखरवाडी शिक्षण संस्थेच्या साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागाचा शालांत परीक्षाचा निकाल ९६.१६ टक्के इतका लागला असून गतवर्षी दहावीच्या परीक्षेला एकूण २०७ विद्यार्थी बसले होते त्यापैकी १९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये कस्तुरी मच्छिंद्र भोसले ९४.८०टक्के प्रथम क्रमांक, तनिष्का रवींद्र सूर्यवंशी ९४.६० टक्के, समीक्षा संदीप भोसले ९४.६० टक्के या दोघींचा द्वितीय व चैतन्य संतोष भोसले ९३.८० टक्के याचा तृतीय क्रमांक आला ९० टक्क्याहून अधिक गुणांमध्ये १५, विशेष श्रेणी ६९, प्रथम श्रेणी ८२ द्वितीय श्रेणी ३२ व पास श्रेणी मध्ये १६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष धनंजय साळुंखे पाटील, संचालक राजेंद्र शेवाळे, राजेंद्र भोसले शाळेच्या मुख्याध्यापिका उर्मिला जगदाळे, पर्यवेक्षक तुळशीराम बागडे यांनी अभिनंदन केले