फलटण चौफेर दि २७ दरवर्षी वैशाख शुक्ल पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा ही उन्हाळ्याच्या दिवसातील सर्वाधिक प्रकाशमान रात्र असते. वैशाख महिन्यात उन्हाच्या झळ्या तीव्र असतात त्यामुळे पाणवठ्यावर हमखास वन्यप्राणी येतात. २४ तासामध्ये त्यांची गणना केली जाते. वन अधिकारी दुपार पासूनच मचाणीवर बसतात. रात्री किमान एकदातरी प्राणी पाणवठ्यावर येतात. मानवी हस्तक्षेपामुळे प्राण्यांच्या संख्येवर कोणता परिणामा झाला आहे का? कोणत्या प्राण्यांची संख्या कमी होत आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी या दिवशी वन्यप्राण्यांची गणना केली जाते. बुद्ध पौर्णिमा मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात येत असल्याने जंगलातील झाडांची पाने गळून गेलेली असतात. त्यामुळे लांबपर्यंतचे प्राणी मचाणावरून दिसतात.
दरवर्षी प्रमाणे फलटण वनविभागाच्या माध्यमातून आदर्की व फलटण राउंडच्या माध्यमातून सातारा वनविभागा च्या उपवनसंरक्षक श्रीमती आदिती भारद्वाज मॅडम व साहयक वनसंरक्षक रेश्मा व्होरकाटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण वनपरिक्षेत्राचे अतिरिक्त (कार्य ) वनक्षेत्रपाल वैभव घार्गे यांच्या नियंत्रणाखाली फलटण तालुक्यातील वनक्षेत्रात प्राणी गणना करण्यात आली त्यामध्ये वनअधिकारी राजेंद्र कुंभार साहेब ' नियतक्षेत्र अधिकारी राहुल निकम , लवांडे मॅडम , सोनकांबळे साहेब , इनकर साहेब ,शिंदे साहेब , पालवे मॅडम , भोये मॅडम इत्यादी नी सहभाग घेवून सदर दिवशी तरस , साळींदर , उदमांजर , लांडगा , वाघाटी, कोल्हा, रानडुक्कर ससा इत्पादी प्राण्यांचे दर्शन झाले
वन विभागगाच्या सतर्कते मुळे व कुत्रीम पाणवट्या मुळे तसेच वृक्षरोपन मोहिमेमुळे मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांची समाधानकारक रित्या वाढ फलटण तालुक्यात झालेली दिसली