साखरवाडी (गणेश पवार)फलटण तालुक्यातील साखरवाडी बडेखान हा रस्ता सध्या वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे दुरुस्ती अभावी सध्या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले असून साईड पट्ट्या खचल्याने या रस्त्याची वाहतूक धोकादायक बनली आहे मागील दोन वर्षांपूर्वी बडेखान ते खराडेवाडी गावाच्या हद्दीतील रेल्वे क्रॉसिंग पर्यंतच रस्त्याची दुरुस्ती झाली होती मात्र तिथून साखरवाडी दरम्यानच्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे
फलटण - लोणंद पालखी महामार्गाला जोडणाऱ्या साखरवाडी बडेखान रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते सर्वसामान्य नागरिकांबरोबरच, शाळकरी मुले, नोकरदार वर्ग या रस्त्याचा वापर करीत असतो मात्र बडेखान ते रेल्वे क्रॉसिंग या १.५ किलोमीटर रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपूर्वी करण्यात आले आहे मात्र तिथून साखरवाडी पर्यंत असणाऱ्या ४ कि मी अंतराचे काम झाले नसल्याने सद्यस्थितीत रस्त्यांवर मोठ-मोठाले खड्डे पडले असून हे खड्डे चुकवताना या रस्त्यावर अनेकदा छोटे मोठे अपघात घडत आहेत. खराडेवाडी गावाच्या हद्दीतील आश्रम शाळेच्या पुढे पोल्ट्री फार्म नजीकच्या तीव्र उतारावर रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईड पट्ट्या पूर्णपणे खचल्याने सध्या हा रस्ता वाहतुकीसाठी अतिशय धोकादायक झाला असून या रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे खड्डे चुकवण्यासाठी वाहनधारक विरुद्ध दिशेने वाहन चालवीत असल्याने या रस्त्यावर समोरासमोर धडक होऊन अनेकदा छोटे मोठे अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत सदर रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करण्याची मागणी या परिसरातील नागरिक व वाहनधारक करीत असून बडेखान ते साखरवाडी हा लोणंद फलटण पालखी महामार्गाला जोडणारा सर्वात महत्त्वपूर्ण रस्ता असून इतर गावातील वाहनचालक सुद्धा या रस्त्याचा वापर सर्रास करीत असतात सध्या गळीत हंगाम बंद असल्याने उसाची वाहतूक बंद असली तरी साखरवाडीच्या कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असताना या रस्त्यावर वाहन चालवताना वाहन चालकांना जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करावा लागत असतो त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती संबंधित विभागाने करावी अशी मागणी वाहनधारक व नागरिकांमधून होत आहे
साखरवाडी बडेखान रस्त्याचा वापर साखरवाडीसह इतर दहा ते बारा गावातील वाहनधारकांकडून होत असल्याने या रस्त्यावर कायमच वाहनांची वर्दळ असते सध्या या रस्त्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून संबंधित विभागाने तत्काळ करावी संजय भोसले ग्रामस्थ साखरवाडी