फलटण चौफेर दि १४ फलटण अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था केंद्र फलटण यांच्यातर्फे दादा महाराज मठ ब्राह्मण गल्ली येथे श्री भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रारंभी संघटनेचे जेष्ठ सदस्य नंदकुमार केसकर यांचे सर्व पदाधिकारी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी जय परशुराम, जय श्रीराम यांच्या घोषणेने परिसर दणाणून सोडला.
प्रारंभी नंदकुमार केसकर यांनी उपस्थित त्यांचे स्वागत करून आपल्या संस्थेतर्फे दर महिन्यात एक कार्यक्रम साजरा केला जातो. यावर्षी नुकत्याच पार पडलेल्या सार्वजनिक मुंजीच्या कार्यक्रम अत्यंत नियोजन पद्धतीने पार पडला. तसेच यावेळी कराड, कोरेगाव, कुर्डूवाडी व फलटण इथून नऊ मुंजी आल्या. यावेळीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व बटूंची दिमाखदार मिळून मिरवणूक पार पडली. हा कार्यक्रम शिस्तबद्ध पार पडला. व वर्षभर सादर होत असलेल्या कार्यक्रमाचा आढावा घेतला.
यानंतर श्री भगवान परशुराम यांचे संपूर्ण जीवनाबाबत व त्यांनी केलेल्या कार्याची माहिती डॉक्टर श्रीपाद चिटणीसांनी सविस्तर दिली त्यांनी दिलेल्या अभ्यासपूर्ण माहिती बाबत त्यांना धन्यवाद देऊन त्यांचं गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने याबाबत सादर केले करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबद्दल स्वानंद चिटणीस, चंद्रशेखर दाणी, डॉक्टर माधुरी दाणी, एड. विजयराव कुलकर्णी यांनी काही सूचना मांडल्या.
पुढील वर्षी हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा करण्याचे ठरवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कुलकर्णी यांनी केले व आभार निखील केसकर यांनी मानले. या कार्यक्रमात संघटनांचे सर्व सभासद बंधू-भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.