फलटण चौफेर दि ५
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लोणंद पोलीस स्थानक हद्दीतील रेकॉर्डवरील १४ गुन्हेगार यांना तडीपार करण्यात आले आहे याबाबत लोणंद पोलीस ठाण्यातून मिळालेले अधिक माहिती अशी निवडणुक काळात दखलपात्र अथवा अदखलपात्र स्वरुपाचा गंभीर अपराध होण्याची शक्यता असल्याचे ओळखुन त्यांचेकडुन सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या करीता दि ५ ते ७ पर्यंत लोणंद पोलीस ठाणे कार्याक्षेत्रात प्रेवश करण्यास मनाई करणेबाबत आदेश होणेकरीता प्रस्ताव मा. उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी फलटण यांना पाठविला होता. त्याप्रमाणे मा. उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी फलटण भाग यांनी माणिक दत्तात्रय शेळके, शुभम दिपक नरुटे, दिपक बबन नरुटे,निलेश विठठल रुपनवर,उमेश विठठल रुपनवर, विनोद नामदेव रुपनवर,शुभम शरद कोकरे, बाळु दिनकर नरुटे,मच्छिंद्र एकनाथ जाधव, अमोल कांतीलाल शेळके, संतोष कांतीलाल शेळके, विराज नामदेव धुमाळ, नामदेव गणपत धुमाळ, तुषार ऊर्फ टिलु नामदेव धुमाळ सर्व रा. मिरेवाडी ता. फलटण जि. सातारा यांना लोणंद पोलीस ठाणे कार्याक्षेत्रात प्रवेश करणेस मनाई करण्यात आली आहे. तडीपार यांचा मतदानाचा हक्क आबाधित राखुन त्यांना मतदानादिवशी दुपारी १ ते ४पर्यंत मतदान केंद्रावर जावुन मतदान करणेकरीता शिथिलता देण्यात आली आहे