फलटण चौफेर दि ४
७ मे रोजी होत असलेल्या माढा लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्या अनुषंगाने फलटण ग्रामीण पोलिसांनी तालुक्यातील तब्बल २३ जणांना तात्पुरते तडीपार केले असून सदर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या आदेशावरून फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी जिल्ह्यामध्ये ज्यांच्या विरुद्ध दोनपेक्षा जास्त मालमत्ता विरुद्ध शरीराविरुद्धचे गुन्हे, अवैधपणे दारू विक्री गुन्हे, मटका, जुगार असे गुन्हे आहेत या लोकांना तात्पुरत्या स्वरूपात दिनांक ५ मे ते ७ मे दरम्यान तडीपार करावे याबाबतचा अहवाल फौजदारी प्रक्रिया संहिता १४४ प्रमाणे उपविभागीय अधिकारी फलटण सचिन ढोले यांच्याकडे पाठवला असता पुढील संशयतांना ७ मे पर्यंत तडीपारीचे आदेश दिले आहेत
साजन पवन भोसले सांगवी,गोकुळ बापू मदने राहणार नव सर्कल फरतरवाडी तालुका फलटण, शाहूराज विठ्ठल जगताप राहणार साखरवाडी तालुका फलटण, गणेश संपत खलाटे राहणार खुंटे तालुका फलटण,अक्षय विजय चव्हाण राहणार साठे फाटा तालुका फलटण, देविदास अभिमान काळे राहणार साखरवाडी तालुका फलटण,विशाल बापू माडकर सुरवडी,धनंजय नंदू करचे फलटण,आर्यन शंकर कांबळे राहणार सांगवी शाहूनगर तालुका फलटण,रोहित उर्फ भैय्या प्रकाश लोंढे सांगवी,गणेश श्रीमंत माने राहणार सांगवी शाहू नगर तालुका फलटण, प्रकाश गुलाब मोरे भाडळी बुद्रुक,मनोहर धनंजय जाधव राहणार साखरवाडी तालुका फलटण, रामदास विनायक मंडले राहणार शाहूनगर सांगवी,ज्ञानेश्वर बापू चव्हाण राहणार शेरे शिंदेवाडी, रामचंद्र दशरथ लोंढे राहणार बरड, सुनील संजय आढाव राहणार गुणवरे,नागेश दीपक कुराडकर राहणार गुणवरे,श्रेयस उत्तम नाळे राहणार दुधेबावी,अमित विठ्ठल उभे राहणार धुमाळवाडी, अशोक बापूराव चव्हाण राहणार खटके वस्ती व रोहित तानाजी शिंदे राहणार पिंपरद यांना ५ ते ७ मे दरम्यान तडीपार करण्यात आले आहे
तसेच या पूर्वी महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार ६ गुन्हेगार तडीपार असून काही लोकांचे आदेश प्राप्त होणार आहेत सदर आरोपी तडीपारी काळात मिळून आलेस त्यांचेवर गुन्हा दाखल कारणेत येणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले