Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मतदार संघाबाहेरील कार्यकर्त्यांनी प्रचाराची मुदत संपल्यानंतर फलटण विधानसभा मतदार संघात थांबू नये- उपविभागीय अधिकारी सचिन ढोले

 


फलटण चौफेर दि ५

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक विना अडथळा व भयमुक्त वातावरणात आणि नि:पक्षपातीपणे पार पडण्याच्या दृष्टीकोनातून  भारत निवडणूक आयोगाकडील  सूचनांनुसार  ४३ माढा लोकसभा मतदारसंघातील  फलटण विधानसभा मतदार संघामध्ये इतर मतदार संघातून आलेले राजकीय कार्यकर्ते, पक्ष कार्यकर्ते, सभेचे कार्यकर्ते, प्रचार कार्यकर्ते की,  जे या मतदार संघातील मतदार नाहीत अशा व्यक्तींनी दि. ५ मे रोजी सायंकाळी ६ वाजलेनंतर मतदारसंघाबाहेर स्वत:हून निघून जावे अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचे  तसेच  ७ मे रोजी मतदान होत असून निवडणूक प्रचाराचा कालावधी आज सायंकाळी ६वाजता संपत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर   फिरती पथके (फ्लांईग स्वाराआणडस्) व स्थिर संनिरिक्षण (एस.एस.टी) अधिक दक्ष असून  ५० हजार रुपये पेक्षा जास्त रक्कम किंवा मौल्यवान धातू, सोने, चांदी / भेटवस्तू, जवळ बाळगणाऱ्या व्यक्तींनी सदर मालमत्ते संदर्भातील कागदपत्रे जवळ बाळगावीत,असे आवाहन  निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे यांनी  केले आहे.  


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.