फलटण चौफेर दि ६ साखरवाडी ता फलटण भागातील सराईत तडीपार मोन्या उर्फ राकेश रमेश निंभोरे वय २८ रा ७सर्कल याचेवर शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्धचे अनेक गुन्हे असल्याने व तो खुनाच्या गुन्ह्यातून बाहेर आल्याने त्याची साखरवाडी भागामध्ये दहशत आहे. साखरवाडी पंचक्रोशीतील गावांमध्ये लोक त्याला घाबरतात. त्यामुळे त्याला फलटण ग्रामीण पोलिसांनी एक महिन्यापूर्वी उपविभागीय अधिकारी फलटण यांच्या आदेशन्वये सहा महिन्याकरिता पुणे, सोलापूर व सातारा जिल्हयातून तडीपार केले आहे.
लोकसभा निवडणूक उद्या आहे त्यामुळे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक, पोलिस हवालदार योगेश रणपिसे, अमोल जगदाळे व बंदोबस्त साठी आलेले प्रशिक्षणार्थी महिला पो शी अश्विनी बागडे, भाग्यश्री पाटील हे साखरवाडी भागात गस्त करत असताना, आज दी ६मे रोजी तडीपार मोन्या निंभोरे व त्याचा साथीदार दत्ता सुरेश मोरे उर्फ दत्ता पावले राहणार ७ सर्कल हे मोटरसायकल वरून जिंती होळ मार्गाने जाताना संध्याकाळी ६.०० वाजता त्यांना दिसले.
पोलिसांनी त्यांना थांबण्याचा केला असता त्याने पोलिसांच्या गाडीवर लाथ मारली, पोलिसांना अपशब्द वापरून पळू लागले त्यावेळी पोलिसांनी पाठलाग करून त्याना पकडले त्यावेळी त्या ठिकाणावरून दत्ता पावले पळून गेला सदर ठिकाणावरून पोलिसांनी ते चालवत असलेली मोटरसायकल क्रमांक एम एच ११ ए एस २७११ ही जप्त केली असून मोन्या निंभोरे व साथीदार या दोघांवर भा द वी कलम ३५३ ३४ सह तडीपारी आदेश भंग केला म्हणून महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १४२प्रमाणे कारवाई केली सदर कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक अंचल दलाल उविभागीय अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनात करण्यात आली आहे निवडणूक काळात सर्व तडीपार लोकांची यादी प्रत्येक अधिकारी कर्मचारी याना देण्यात आली आहे ते सापडल्यास त्यांना अटक करण्यात येणार आहे जनतेने न घाबरता माहिती देण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे