फलटण चौफेर दि ७संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण तालुक्यामध्ये सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये १८टक्के मतदान झाले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली संपूर्ण तालुक्यात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असल्याने मतदान शांततेत व सुरळीत चालू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी दिली