फलटण चौफेर दि १४फलटण येथे आजपासून श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दि. १४ रोजी सायंकाळी ६ वाजता स्मृती महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रसिध्द नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आ. रामराजे ना. निंबाळकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. दि. १५ रोजी महेश हिरेमठ यांचा लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम,दि. १६ रोजी जुनी व नवीन मराठी गीतांचा सुरेल मैफल, दि. १७ रोजी ग्राम विकासाचा आदर्श या विषयावर भास्करराव पेरे-पाटील यांचे व्याख्यान, दि. १८ रोजी शाहीर अविष्कार देसिंगे यांचा लोककलेचा अविष्कार हा पोवाड्याचा कार्यक्रम, दि. १९ रोजी ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांचे भारताची एकात्मता व मान्सून या विषयावर व्याख्यान, दि. २१ रोजी संजय कळमकर यांचा हसण्यासाठी जन्म आपला हा प्रबोधनाचा कार्यक्रम, दि. २२ रोजी जादूगार शिवम व भैरव आनंद यांचे जादूचे प्रयोग, दि. २३ व २४ रोजी विद्यार्थ्यांचा कलाविष्काराचा कार्यक्रम होणार आहे. दि २५ रोजी स्मृती महोत्सवाचा समारोप, बक्षीस वितरण व सत्कार समारंभ होणार आहेत