फलटण चौफेर दि ३०तडवळे ता फलटण गावातील सुरू असलेली अवैद्य दारू विक्री बंद करण्याबाबत तडवळे ग्रामपंचायतच्या वतीने लोणंद पोलिसांकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे लोणंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, तडवळे गावात अवैद्य दारू विक्री सुरू असून ग्रामपंचायतच्या वतीने संबंधित दारू विक्रेत्यांना वारंवार नोटीसा बजावून सुद्धा सदर विक्रेते अवैध दारू विक्री बंद करीत नाहीत यामुळे गावातील तरुणांमध्ये व्यसनाधींचे प्रमाण वाढले आहे तसेच गावांमध्ये वारंवार वादविवादाचे प्रसंग उद्भवत असून परिणामी गावातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे याबाबत गावातील महिला ग्रामपंचायत मध्ये येऊन वारंवार तोंडी तक्रारी देत आहेत त्यामुळे तडवळे गावातील अवैद्य दारू विक्री लोणंद पोलीसांनी बंद करण्याची विनंती ग्रामपंचायत च्या वतीने देण्यात आलेल्या पत्रकात केली आहे
२६ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेमध्ये सर्वानुमते गावामध्ये अवैध दारू विक्री बंद करण्याबाबत ठराव सुद्धा सर्वानुमते मंजूर करण्यात आला असल्याचेही गावचे सरपंच अशोक खराडे यांनी सांगितले