फलटण चौफेर दि २७साखरवाडी तालुका फलटण गावाच्या हद्दीत फलटण ग्रामीण पोलिसांनी वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या एकूण २५ वाहन चालकांवर कारवाई करून तब्बल १३ हजाराचा दंड वसूल केला
साखरवाडी परिसरात रोड रोमिओ,जॉय राईड करुन गाडी पळवणारे वाहतुकीस अडथळे करणारे, सायलेन्सर काढणारे, फैंसी नंबर प्लेट, मद्य प्राशन करून वाहन चालवणे अशा वाहन चालकांवर लोकांवर फलटण ग्रामीण यांची साखरवाडी परिसरात कारवाई करून १३ हजाराचा दंड वसूल केला कारवाई पथकामध्ये फलटण ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट,अशोक हुलगे, सहाय्यक पोलीस फौजदार पांडुरंग हजारे, वाहतूक हवालदार तानाजी ढोले,पो कॉ रामदास पठाडे,गणेश ठोंबरे,शिवाजी सावंत यांचा समावेश होता