फलटण चौफेर दि ७
संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण तालुक्यामध्ये सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी ७ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये २९.७७टक्के मतदान झाले असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले सध्या संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये कडक उन्हाळा असल्याने तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे त्यामुळे मतदार मतदानासाठी दुपारच्या काळात बाहेर पडताना दिसत नाहीत मात्र दुपारी ४ वाजल्यानंतर उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर मतदार बाहेर पडून मतदानाच्या टक्केवारी मध्ये वाढ होईल अशी आशा आहे