फलटण चौफेर दि २८फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण, येथील गणित विषयाचे प्रा. दत्तात्रय नबाजी शिंदे, रा. ठाकुरकी (वाठारमळा), ता. फलटण, यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी. प्रदान करण्यात आली. शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ . पी. एस. पाटील यांच्या हस्ते व पीएच. डी. मार्गदर्शक प्रा. डॉ. एम. टी. गोफणे, गणित अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर,यांच्या उपस्थितीत पीएच. डी. पदवी प्रमाणपत्र देण्यात आले.
त्यांच्या संशोधन प्रबंधाचे शीर्षक "अ कॉन्ट्रिब्युशन टू द थेअरी ऑफ टर्नरी अल्जेब्राईक सिस्टिम्स " आहे. या संशोधनाचा उपयोग संगणकीय विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, कन्ट्रोल इंजिनीरिंग, कोडिंग थेअरी, ऑटोमेटा थेअरी, टोपोलॉजिकल स्पेस इत्यादी क्षेत्रांमध्ये विविध प्रकारे केला जातो. प्रा. दत्तात्रय शिंदे यांनी त्यांच्या पीएच. डी. दरम्यान सहा शोधनिबंध प्रकाशित केले व अकरा (राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय) परिषदेमध्ये सहभाग घेऊन शोधनिबंध सादर केले.
प्रा. दत्तात्रय नबाजी शिंदे हे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण येथे सन २०१२ पासून गणित विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. पीएच. डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल प्रा. दत्तात्रय शिंदे यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एन. जी. नार्वे व सर्व शिक्षकांनी त्यांचे यांनी अभिनंदन केले.