Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

साखरवाडीत रस्ता दुरुस्तीत रोगापेक्षा इलाज भयंकर खड्ड्यात मातीयुक्त मुरम, 'मेडिकल वेस्टेज'

 


फलटण चौफेर दि २८साखरवाडी ता फलटण गावातील बाजारपेठेमधून जाणाऱ्या मुख्य रस्त्याची प्रचंड प्रमाणात दयनीय अवस्था झाली आहे यामुळे या रस्त्याच्या दोन्ही बाजूने असणाऱ्या व्यापाऱ्यांना धुळीच्या लोटांचा  व वाहनाच्या टायर मधून उडणाऱ्या दगडांचा प्रचंड प्रमाणात त्रास होत आहे सद्यस्थितीत या रस्त्यावर डांबर व खडी याचा मागसुस नाही  मात्र यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने  या रस्त्यावरील खड्डे भरण्याची मोहीम हाती घेऊन ज्या ठिकाणी संपूर्ण रस्ता खड्ड्यात गेला आहे अशा ' अस्तित्वहीन' रस्त्याची डागडुजी करून साखरवाडीकरांचे थट्टा केल्याची  संतप्त भावना नागरिक व्यक्त करीत आहेत

मागील १७ वर्षांपूर्वी डांबरीकरण झालेल्या या रस्त्याची  दुरुस्ती अथवा डांबरीकरण आजपर्यंत न झाल्याने सध्या रस्त्यावर डांबर किंवा खडी यांचे कोणतेच अवशेष शिल्लक नाहीत यावर मागील दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यांवरील ठराविक खड्ड्यांमध्ये दगड व माती मिश्रित मुरूम टाकून रस्त्याची दुरुस्ती केल्याचे दाखवले मात्र या माती मिश्रित मुरमामध्ये मेडिकल वेस्टेज असल्याने या मेडिकल वेस्टेज मधल्या इंजेक्शनच्या सुया, सिरीन व सलाईनच्या पाईप रस्त्यावर पडलेल्या आहेत यामुळे आधीच खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या नागरिक,व्यापारी व वाहनधारक  मोठ्या प्रमाणात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत साखरवाडी बाजारपेठेमधून पिंपळवाडी ते काळुबाई चौक या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावर कायमच वर्दळ असते साखरवाडीहून मुरूम, खामगाव व सोमेश्वरला जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर केला जातो  फलटण तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या साखरवाडीमध्ये आसपासच्या दहा ते पंधरा गावातील लोकांचे रोजच्या दैनंदिन व्यवहारासाठी कायमच येणे जाणे असते यामुळे या रस्त्यावर वारंवार वाहतुकीची कोंडी देखील होत असते आजमितीला  या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून  बाजारपेठेतील दुकानदार, व्यावसायिक व  नागरिक यांना यामुळे  मनस्ताप सहन करावा लागत आहे अशातच संबंधित विभागाने या रस्त्याची जगावेगळी दुरुस्ती करून साखरवाडीकरांची थट्टा केल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यापारी, नागरिक व वाहनधारक व्यक्त करत आहेत

मागील १७ वर्षापासून या रस्त्याची डागडुजी झाली नाही संबंधित विभागाने सध्या रस्त्यावर टाकलेल्या माती मिश्रित मुरमामुळे पावसाळ्यात या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात चिखल होणार आहे विनोद जाधव उपाध्यक्ष  साखरवाडी व्यापारी असोसिएशन



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.