Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण येथे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा उद्या प्रचार शुभारंभ

   


    फलटण चौफेर दि. २२ :  माढा लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा फलटण  विधानसभा मतदार संघातील प्रचाराचा शुभारंभ मंगळवार दि. २३ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता श्रीराम मंदिर, फलटण येथे श्रीफळ वाढवून करण्यात येणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट), राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), शेकाप, आप या पक्षांच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून माढा  धैर्यशील मोहिते पाटील यांच्या २५५ फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघातील निवडणूक प्रचार शुभारंभ   माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून समारंभपूर्वक करण्यात येणार असून, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या प्रचार शुभारंभास श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन महादेवराव पवार तथा आबा, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर तथा बाळराजे खर्डेकर, मुंबई व फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन डॉ. विजयराव बोरावके, सद्गुरु व महाराजा संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, ॲड. नरेंद्र तथा राजू कृष्णचंद्र भोईटे, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण संचालक चेतन सुभाषराव शिंदे.श्रीराम एज्युकेशन सोसायटी मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी बेडके, राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी बेडके, अमीरभाई शेख.पंकज पवार शहर अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस फलटण शिवसेना सातारा जिल्हाध्यक्ष संजय भोसले, फलटण तालुकाध्यक्ष प्रदीप झणझणे, विकास नाळे, उत्तर कोरेगाव संतोष सोळसकर, आपचे तालुकाध्यक्ष अनिकेत नाळे, धैर्यशील लोखंडे, वीरसेन सोनवणे. दलित पँथर फलटणचे रोहित अहिवळे उपस्थित राहणार आहेत.  तरी फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघातीलराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट), राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), शेकाप, आप या पक्षांच्या महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह मतदार बंधू - भगिनी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.