फलटण चौफेर दि १४
भिलकटी ता. फलटण येथे भिमजयंती निमित्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर गावातील ग्रामस्थांनी मनोगते व्यक्त करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित, स्त्रीया, गोरगरीब यांच्या साठी केलेल्या कार्याबाबत उपस्थितांना अवगत केले. यावेळी भिलकटी गावचे पोलीस पाटील शांताराम काळेल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाला संविधान देण्याबाबतचे अमूल्य कार्य, त्यांनी केलेला संघर्ष व त्यातून मिळवलेले यश आजच्या तरुणाईला कसे प्रेरणादायी आहे याबाबत संबोधित केले. याप्रसंगी श्री. उत्तमराव पवार, कुणाल कांबळे, मंगेश कांबळे, ग्रामपंचायत सदस्या दिपाली कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
याप्रसंगी सरपंच सौ. सविता उत्तमराव पवार, ग्रामपंचायत सदस्या दिपाली कांबळे, ग्रामसेविका उज्वला गार्डी, भारत कांबळे, तुकाराम कांबळे, स्वप्नील कांबळे, दादासो मोहिते, मंगेश कांबळे, , प्रदिप कांबळे, मल्हारी भंडलकर, राजेंद्र भंडलकर व पंचशील मित्र मंडळाचे अनेक सभासद उपस्थित होते.
यावर्षीच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक, भिमगितांचा कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत सदस्या दिपाली कांबळे यांनी केले आहे.
