' घटनेचे शिल्पकार' म्हणून ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते महा मानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
घटना, लिहीण्याचं काम सामान्य नव्हतं,
भारत देश विविध जाती-धर्मांनी, संस्कारांनी, नटलेला देश आहे, देश चालवण्यासाठी नियम, घटना, लिहिणे आवश्यक होते, वास्तविक पहाता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राजकारणी, मग त्यांना घटना लिहिण्याचं हे काम का दिल गेलं ? या मागचा इतिहास....
माननीय, डॉ. बाबासाहेब अत्यंत हुशार, बुद्धिमान, साऱ्या देशातून त्यांना मागासवर्गाचा मोठा पाठिंबा होता, नुसता पाठिंबा नव्हता, तर महाराष्ट्र सोडून इतर भागातले लोकही त्यांना देव मानायचे, मा. बाबासाहेब हे उच्च शिक्षित, पीएचडी पदवी, दोनदा मिळविली होती, आणि मंत्रिमंडळात त्यांनी त्यांचे प्रभुत्व सिद्ध केलं होतं, पहिल्या लोकसभेमध्ये त्यांना मंत्रीपद सुद्धा मिळालं, आणि स्वतःच्या हुशारीची चुणूक त्यांनी दाखवली.
तत्कालीन राजकीय नेते बाबासाहेबांवर बारीक लक्ष ठेवून होते, कारण त्यांना सदैव बाबासाहेबांची भीती वाटायची, हा माणूस, एक दिवस मला बाजूला सारून देशाचा पंतप्रधान होईल,
बाबासाहेबांना मंत्रीपदावरून दूर करायला माननीय वल्लभभाई पटेल यांनी विरोध केला होता, पण बाबासाहेबांचे उत्तर होतं की......
देशाकरता, मी पदत्याग करीन, माझा देश, माझं सर्वस्व आहे.
घटना लिहिण्याचे काम करीन, मंत्रीपदापेक्षा, मला ते काम जास्त महत्त्वाच वाटतं.घटना लिहिण्यासाठी विविध क्षेत्रातील, कित्येक विद्वान लोकांचा सहभाग लागला. आर्थिक, सामाजिक, बौद्धिक, धार्मिक, परराष्ट्रनीती, पोलीसनीती, सैन्यांची आखणी, सर्व शासकीय अधिकार, न्यायालयाची जबाबदारी, राजकीय पक्ष, लोकसभा, राज्यसभा, यांचे अधिकार, निवडणूक आयोगाचे अधिकार, पंतप्रधान, राष्ट्रपतीचे अधिकार, अशा सर्व क्षेत्रातील विद्वानांना एकत्र आणून, अत्यंत जोखमीने ही मोट बांधण्याचे काम माननीय बाबासाहेब यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांनी घालून दिलेल्या नियमाने, घटना लिहिण्याचे महान कार्य पूर्ण केले.
किती महान माणूस, केवढा महान विचार, केवढा त्याग, आणि किती असीम राष्ट्रप्रेम..
डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात....
घटना लिहिण्याचे कष्ट मला जास्त पडले नाहीत, कारण माझ्या डोळ्यासमोर, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं होतं
अशा या युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!!
श्री. रवींद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी. ता. फलटण. जि. सातारा फोन.९९७०७४९१७७
