फलटण चौफेर दि १७ आज रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास फलटण तालुक्यातील साखरवाडी,सुरवडी,खराडेवाडी,तडवळे सह परिसरात झालेल्या वादळी वारे व मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसामुळे परिसरातील रस्त्यांवर झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत साखरवाडी बडेखान रस्त्यावर माने फार्म शेजारी रस्त्यावर झाड पडल्याने साखरवाडी बडेखान रस्ता मागील दोन तासापासून वाहतुकीसाठी बंद आहे
फलटण तालुक्यासह परिसरात दोन तास मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली तर काही ठिकाणी गारपीटसुद्धा झालेली आहे फलटण शहरासह साखरवाडी, सुरवडी,निंभोरे, खराडेवाडी, तडवळे, तरडगाव गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढले त्यामुळे असेही व कड्यापासून नागरिकांची सुटका झाली तर गारपिटीमुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे
