फलटण दि १७
माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने फलटण विधानसभा संघामध्ये मतदानाचा टक्का वाढावा तसेच भारत निवडणूक आयोगामार्फत दिव्यांग मतदारांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा बाबत माहिती होण्यासाठी दिव्यांग मतदारा मध्ये मतदान जागृतीचा कार्यक्रम आयोजन दि १९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता फलटण पंचायत समिती सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे सदर कार्यक्रमासाठी दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे या कार्यक्रमाचे आयोजन तहसीलदार फलटण डॉ अभिजित जाधव, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, मुख्याधिकारी नगरपरिषद फलटण निखिल मोरे तसेच एस के कुंभार स्वीप नोडल ऑफिसर, शहाजी शिंदे, पूजा दुदुस्कर , स्विफ्ट पथक प्रमुख तसेच शिफ्ट सहाय्यक अधिकारी सचिन जाधव व स्वीप कक्ष फलटण यांच्यावतीने करण्यात आले आहे
