फलटण चौफेर दि १२
सुरवडी(जगताप) वस्ती ते ५ सर्कल रस्त्याचे सुरू असलेले डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करून सदर काम ग्रामस्थांनी बंद पाडले व जोपर्यंत या रस्त्याच्या कामाचा दर्जा सुधारत नाही तोपर्यंत ठेकेदाराला काम करून देणार नसल्याचा इशारा यावेळी दिला
सुरवडी जगताप वस्ती ते ५ सर्कल या रस्त्याची सद्यस्थितीत अतिशय दयनीय अवस्था झाली आहे जगताप वस्ती ते सुरवडी या तीन किलोमीटरच्या रस्त्याच्या आजूबाजूला जगताप वस्ती, माळीमळा, घारगेमळा, पवारमळा अशा वस्त्या आहेत साखरवाडी व फलटण लोणंदला जाण्यासाठी या रस्त्यावरून रोज शेकडो अबालवृद्ध, महिला व शाळकरी मुलांना ये जा करावी लागते तसेच साखरवाडीहुन फलटणला जाण्यासाठी बरेच वाहनधारक बडेखानला न जाता तीन ते चार किलोमीटरचे अंतर कमी होत असल्याने या रस्त्याचा वापर करीत असतात त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते मात्र मागील बऱ्याच वर्षापासून दुरवस्था झाल्याने वाहनधारक व ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत होता मात्र अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सद्यस्थितीत रस्त्याचे काम सुरू झाल्याने वाहनधारक व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत होते मात्र ठेकेदाराकडून हे काम निकृष्ट दर्जाच्या होत असल्याचा आरोप करून आज ग्रामस्थ आक्रमक झाले व त्यांनी हे काम बंद पाडले व जोपर्यंत कामाचा दर्जा सुधारत नाही तोपर्यंत हे काम सुरू होऊ देणार नसल्याचेही यावेळी निक्षून सांगितले यावेळी ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत पवार, विकास सोसायटीचे संचालक मोहन पवार, विकास सोसायटीचे माजी व्हा चेअरमन दौलत पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश पवार, भगवान पवार, अरुण पवार, काकसो पवार,भाऊसाहेब पवार, अंकुश वाघ, संदीप पवार, राजेंद्र पवार, दीपक पवार, राहुल पवार, सुभाष चौरे, बापू राऊत,चंद्रकांत पवार व ग्रामस्थ उपस्थित होते