Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्व. यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ उर्जा व प्रेरणा स्त्रोत- उपमुख्यमंत्री अजित पवार



सातारा, दि. १२ :(जिमाका)

स्व. यशवंतराव चव्हाण यांचे प्रितीसंगमावरील समाधीस्थळ उर्जा व प्रेरणा स्त्रोत आहे. शासनाच्या माध्यमातून लोकहिताचे काम करीत असताना असे उर्जा व प्रेरणा स्त्रोत सहायभूत ठरतात. महाराष्ट्राच्या जडण घडणीत स्व. यशवंतराव चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्यामुळे आज महाराष्ट्र कृतिशील  व प्रगल्भ महाराष्ट्र घडला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

कराड येथे आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठान कराडतर्फे स्व. यशवंतरावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींची शब्द सुरांची भावपूर्ण आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुनिल तटकरे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कामामुळेच शेती, व्यापार, आरोग्य, शिक्षण, सहकार यासह अनेक क्षेत्रात महाराष्ट्राचा पाया भक्कम उभा आहे. राजकारण, समाजकारण त्यांनी वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले. त्यांची नाळ शेवटपर्यंत जनतेशी जोडली गेली होती.  राजकारणावर त्यांचा वेगळा ठसा व प्रभाव होता. दिल्लीतील त्यांचं घर उभ्या महाराष्ट्राला आपलसं वाटत होते, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती दिनानमित्त कराड येथील प्रितीसंगमावरील समाधी स्थळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवान केले. यावेळी त्यांच्या समवेत विविध मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.